हिमायतनगर प्रतिनिधी/कारला जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नागेश कोथळकर तर उपाध्यक्षपदी नागसेन गोखले यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे
सोमवारी कारला जिल्हा परिषद शाळेत पालकांची सभा घेण्यात आली या सभेत अध्यक्ष पदासाठी चार नाव समोर आली होती यामध्ये पालकांचे मतदान घेण्यात आले .नागेश कोथळकर यांना पालकांचे मतदान जास्त झाले असल्याचा निकाल हाती आल्यानंतर अध्यक्षपदी नागेश कोथळकर यांची निवड जाहीर करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नागसेन गोखले यांची निवड झाली व सदस्य निवडण्यात आले खेळीमेळीच्या वातावरणात शालेय शिक्षण समिती निवड झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक,गावातील प्रतिष्ठित नागरिक पालकांची उपस्थिती होती.
कारला जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी नागेश कोथळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मंगळवारी प्रगती कोचिंग क्लासेसचे संचालक रमेश कदम , मिर्झा सर, पोलिस पाटील साईनाथ कोथळकर, वानखेडे सर
यांच्यासह प्रगती क्लासेस मधील सर्व टीमच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले आहेत
