हिमायतनगर प्रतिनिधी/- हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी होऊन नागरीकांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्य , घरगुती वापराचे भांडीकुंडी व जिवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले होते पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले त्या नागरिकांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन धनादेश वाटप करण्यात आले.मंगळवारी हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार, कर्मचारी अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
.मंगळवारी हिमायतनगर तहसील कार्यालयात आ.बाबुराव कदम, तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी विरुन जिवनावश्यक वस्तु, भांडी, कपड़े व अन्नधान्य सामग्रीची नासाडी झाल्यास आपदग्रस्तांना मदत अनुदान चेकचे वाटप करण्यात आले.शहरासह ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते राहत्या घरातील संसारोपयोगी साहित्य अन्नधान्याचे नुकसान झाले त्यामुळे नागरीकांना उघड्यावर रहावं लागेल होते त्या नागरीकांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाडून चेकचे वाटप आमदार , तहसीलदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विकास पाटील देवसरकर,राजू पाटील भोयर, रामभाऊ सुर्यवंशी, गजानन हारडपकर, सदाशिव सातव, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी अधिकारी उपस्थित होते.
