भक्ती मार्गाने चालत रहा जिवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही - प्रा.मारोती देवकर .... सचिन बोंपीलवार यांचा गावकऱ्यांकडून सत्कार

हिमायतनगर प्रतिनिधी/- प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये सांप्रदायासह भक्तिमार्गाला महत्त्व दिले पाहिजे साधुसंताच्या विचाराने जीवन जगले तर भविष्यात आपले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे प्रत्येकाने सांप्रदायिक भक्ती मार्गाने चालत राहावे असे आवाहन प्राचार्य मारोती देवकर यांनी केली आहे .

      कारला पी येथे सार्वजनिक गणपती मंडळाच्या वतीने संगीत क्षेत्रातील कलावंत सचिन बोपीलवार यांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल सत्कार केला या सत्कार प्रसंगी बोलताना प्राचार्य देवकर म्हणाले की संत महंताच्या विचाराने व त्यांच्या प्रेरणेने आपण वागत राहिलो तर समाजाप्रती आपली भावना ही एक वेगळी असेल म्हणून प्रत्येकाने हरिनामाचा भक्ती मार्ग धरला पाहिजे यातूनच आपल्या जीवनाचे कल्याण साकार होऊ शकते आणि प्रत्येक व्यक्ती एक चांगल्या मार्गाने जगू शकते म्हणून प्रत्येकाने संतांच्या विचाराने वागले पाहिजे असे आवाहन देवकर यांनी केली गेल्या तीन पिढ्यापासून या भूम्पीलवार परिवाराच्या घराण्यातील सांप्रदायिक वारसा अखंडपणे सुरू असून त्यांच्या सांप्रदायिक भक्ती मार्गाने मार्गामुळे आज त्यांनी यशस्वी शिखर गाठले आहे. म्हणून ते अखंडपणे सांप्रदाय भक्ती मार्ग धरून चालत आहेत त्या संतांच्या आशीर्वादाने भविष्य त्यांचे उज्वल झाले आहे असे देखील देवकर म्हणाले यावेळी पोलीस पाटील साईनाथ कोथळकर, तंटामुक्त अध्यक्ष डॉ गफार,गणेश मंडळाचे अध्यक्ष बालाजी मोरे ,उपाध्यक्ष शिवाजी गारशटवाड, संजय गोखले सुनील घोडगे , अशोक आचमवाड,ग्यानबा इटेवाड, विठ्ठल आचमवाड,अशोक बोंपीलवार, शंकर मोरे, कृष्णा बोंपीलवार,वसंत मिराशे, गजानन मिराशे,जनार्दन मुठेवाड,श्रीनिवास बोंबीलवार आदी भाविकांची उपस्थिती होती..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.