हिमायतनगर तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी सदृश्य पाऊस- पिचोंडी शिवारात वीज कडाडून दोन शेतकरी गंभीर...



हिमायतनगर प्रतिनिधी/- गुरुवारी हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊन सर्वत्र हाहा आकार झाला होता.छोट्या मोठ्या नाल्यांना पूर देखील आला पिचोंडी शिवारामध्ये वीज पडली परंतु काही अंतरावर असलेल्या दोन शेतकऱ्यांना विजेचा जब्बर धक्का बसला आहे.गंभीर अवस्थेत असलेल्या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात केले असता या घटनेत दोघेही शेतकरी बालंबाल बचावले आहेत.दोन वर्षापुर्वी याच शिवारात विज पडून वडीलांचा मृत्यू झाला होता आज पुन्हा मुलावर तिच परिस्थिती ओढावली होती परंतु दैव बलवत्तर म्हणून बचावलो असल्याची प्रतिक्रिया गंभीर मुलांनी व्यक्त केली आहे.
 तालुक्यातील पिचोंडी गावातील शेतकरी प्रभाताई रघुनाथ मिराशे, 
गजानन विठ्ठल मिराशे ,कविता गजानन मिराशे हे शेतातील मुग तोडण्यासाठी गेले होते.दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस विजांचा गडगडाट सुरू झाला होता.यामुळे तिघेजण शेतातील झोपडी मध्ये असरा घेत होते.तर यातील प्रभाताई रघुनाथ मिराशे, गजानन विठ्ठल मिराशे ,हे दोघे झोपडी बाहेर होते.यांच्या उभे असलेल्या काही अंतरावर विज पडली या विजेचा जब्बर धक्का या दोघांना बसताच दोघेही जागेवर कोसळले होते.अर्चना मिराशे हि महिला दुर असल्याने तिला धक्का बसला नाही पिचोंडी गावातील व शिवारातील शेतकऱ्यांच्या मदतीने दोघांना तातडीने हिमायतनगर येथील रूग्णालयात दाखल केले . 
गजानन मिराशेच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने टाके पडले आहेत तर महिलेची साडी जळून पायाला व एका हाताला जबर दुखापत झाली असुन गंभीर जखमी झाले असले तरी बालंबाल बचावले आहेत.
 नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी दुखापत झाली असून सदरील शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाने मदत करावी अशी मागणी पिचोंडी कारला येथील शेतकऱ्यांनी केली आहे.गुरुवारी सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते दुपारी अचानक मुसळधार सदृश पाऊस पडला आहे.


... विज पडून वडील गेले दैव बलवत्तर मुलगा बचावला

  पिचोंडी शिवारात याच ठिकाणी आज घडलेल्या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या गजानन मिरासे यांचे वडील विठ्ठल मिरासे यांच्यावर देखील दोन वर्षांपूर्वी शेतामध्ये काम करीत असताना वीज कडाडली व या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता .त्यानंतर पुन्हा गुरुवारी देखील याच शिवारामध्ये वीज कोसळून गजानन मिरासे यांना जबर धक्का बसला असून ते बालंबाल बचावले आहेत माझे वडील याच घटनेत गेले परंतु आज मी बचावलो आहे अशी प्रतिक्रिया गंभीर असलेल्या गजानन गिरासे यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.