गर्भवती महिलेला बोट मधून हिमायतनगर रुग्णालयात केले दाखल...शिरपल्ली व डोलारी गावात महसूल व वैद्यकीय पथकाचे यशस्वी कार्य

हिमायतनगर प्रतिनिधी/ डोल्हारी सिरपली गावाचा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्क तुटला असुन सततच्या पावसामुळे गावातील नागरिकांसह अबालवृद्ध तापीच्या आजाराने त्रस्त झाले होते परंतु या गावात वैद्यकीय सेवा देणे शक्य नव्हते गुरूवारी महसूल व वैद्यकीय पथकाने शिरपल्ली आणि डोलारी या पूर्णतः संपर्क तुटलेल्या गावात बोट द्वारे यशस्वीपणे पोहोचून मदतकार्य सुरू केले व एका गर्भवती महिलेला बोटच्या माध्यमातून हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्रशासनाने जिव धोक्यात घालून कार्य केले गावकऱ्यांनी कौतुक केले.

 उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांच्या नेतृत्वात महसूल व वैद्यकीय पथकाने शिरपल्ली आणि डोलारी या पूर्णतः संपर्क तुटलेल्या गावात यशस्वीपणे पोहोचून मदतकार्य सुरू केले.

या मोहिमेत नायब तहसीलदार एच. जी. पठाण, मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी सब्बनवार तसेच डॉक्टर व त्यांची टीम सहभागी झाली होती. दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पासून मुसळधार पावसामुळे या गावांचा संपर्क तुटला होता. काल संध्याकाळी मुसळधार पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे पथकाला गावात प्रवेश करता आला नाही. अखेर गुरुवारी सकाळी बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून पथकाने गावात प्रवेश केला.सिरपली येथील गर्भवती महिलेला पाण्याच्या पुरामुळे गावाबाहेर पडता जमत नव्हते महसूल व वैद्यकीय पथकाने शिरपल्ली आणि डोलारी या पूर्णतः संपर्क तुटलेल्या गावात यशस्वीपणे पोहोचून मदतकार्य सुरू केले.व गर्भवती महिलेला बोटच्या सहाय्याने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.व गावात वैद्यकीय पथकाने तात्काळ आरोग्य सेवा सुरू केली असून जखमी व आजारी नागरिकांची तपासणी करण्यात आली. सुदैवाने गंभीर रुग्ण आढळून आले नाहीत. यासोबतच जुन्या व नुकसानग्रस्त वस्तूंची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
या मोहिमेत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे मनःपूर्वक स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी पो. पा. मंदाबाई जाधव, डॉक्टर प्रताप परभनकर,डॉ. गोविंद वानखेडे आशा वरकर कांता तपासकर व गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.