हिमायतनगर प्रतिनिधी/- मणूष्य जन्माला आल्यानंतर सत्ता, पैसा, अंह़कार,मोठेपणा यामध्ये गुरफटून असतो हे सर्वकाही बाजूला सारून जिवनाचा काला करण्यासाठी सर्व जाती धर्मातील माणसाला सोबत घेऊन आपल्यातील अहंकार दूर ठेवत जिवन जगले पाहिजे यातुनच खरा जिवनाचा काला होतो आणि जिवन साकार होते असे प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी किर्तन सेवेत व्यक्त केले.
हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्त महिनाभर ओम नमः शिवाय नामाचा जप व श्री शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते या कथेचा समारोप गुरूवारी प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाले आहे.या काल्याच्या किर्तनात भाविकांशी बोलताना गजेंद्र महाराज म्हणाले की संतांच्या चरणी नतमस्तक झाले पाहिजे
परमार्था सुध्दा तण मन धन एकत्र केले तेव्हांच खरा काला होतो
शरीराने मनाने एकत्र आलं पाहिजे तरच जिवनाचा काला साकार होतो अन्यथा जिवनात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मणूष्याने जिवनाचा काला करण्यासाठी अंगातील अहंकार दूर ठेवावं , जातीभेद नष्ट करावीत, प्रत्येक माणसाला सोबत घेऊन
नामाचे चिंतन करावे भगवान परमात्मा श्री गोपाल कृष्ण स्वरूप,व्यापक आहेत भगवान श्रीकृष्णांनी अनेक खेळ खेळले आजची पिढी खेळ विसरून जात असुन हातात मोबाईल व्यतिरिक्त इतर खेळ दिसत नाही यासाठी आहे आई वडिलांचे संस्कार कुठेतरी कमी पडत आहेत म्हणून प्रत्येकांने जिवनातील काला करण्यासाठी शरीराने मनाने एकत्र आले पाहिजे असे सांगितले आहे या प्रसंगी प.प.बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांची उपस्थित होते.ओम नमः शिवाय नामाचा जप मध्ये सहभागी भाविकांचा सन्मान करण्यात आला.या शिवपुराण कथेची सांगता
काल्याच्या किर्तनाने झाली आहे.भव्य महाप्रसाद
माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वतीने करण्यात आला होता हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या वेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर,
मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, डॉ राजेंद्र वानखेडे, गजानन सुर्यवंशी, विठ्ठल ठाकरे, गणेश शिंदे, संजय माने, विलास वानखेडे, मारोती पाटील,राम सुर्यवंशी,गजानन चायल, शिवाजी जाधव,बाळासाहेब चवरे, डॉ प्रकाश वानखेडे, सुभाष शिंदे,वामनराव मिराशे,संतोष वानखेडे, अमोल कोटुरवार,पंडीत ढोणे यांच्यासह परमेश्वर मंदिर संचालक मंडळ व शहरासह ग्रामीण भागातील महिला पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने सांगता सोहळ्यात गर्दी केली होती.
