हिमायतनगर प्रतिनिधी/- उमरी येथील उद्योजक मारोतराव कवळे गुरूजींचे कार्य शेतकऱ्यांसह समाज हितासाठी लाभदायी असुन त्यांच्या कार्यातून समाजाचा उद्धार कसा होईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो त्यांच्यासाराखे माणसं या पिढीला महत्वाचे असुन त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी व्यक्त केले.कवळे गुरूजी यांचा सत्कार देखील केला आहे.
हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्ताने प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या श्री शिवपुराण कथा सुरू आहे.कथेला उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांनी भेट देऊन श्री परमेश्वराचे दर्शन घेतले.यावेळी बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी कवळे गुरूजींचा सत्कार केला.परमेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला.या कथेमध्ये सत्कार प्रसंगी बोलताना गजेंद्र चैतन्य महाराज म्हणाले की आजच्या पिढीमध्ये समाज हितासाठी कामा करणारी माणसं कमी झाली आहेत.मारोती कवळे गुरूजींनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव देऊन कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासत आहेत.बंकेच्या माध्यमातून अनेकांना उद्योग व्यवसायासाठी मदत करीत हाताला काम लावले असे व्यक्तिमत्व समाजासाठी महत्वाचे असुन त्यांचे कार्य समाजहितासाठी लाभदायी असल्याचे सांगितले . उद्योजक मारोतराव कवळे यांनी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या विरसणी येथील मठाची पाहणी केली व आशिर्वाद घेतले.यावेळी मंदिर ट्रस्ट चे महाविरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते,माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, समद खान, माजी संचालक शेख रफीकभाई,गणेश शिंदे,अ.आखिल ,संजय माने, ज्ञानेश्वर शिंदे, मारोती लुम्दे, विलास वानखेडे,देवकते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
कवळे गुरूजींचे कार्य शेतकऱ्यांसह समाज हितासाठी लाभदायी - प.पू.बालयोगी महाराजांकडून सत्कार.
0
August 23, 2025
Tags
