हिमायतनगर तालुका अंतर्गत इयत्ता बारावी परीक्षा 2025
दि.11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत.तालुक्यातील एकुण 1457 परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा केंद्र 0181 हुतात्मा जयवंतराव पाटील या केंद्रांवर एकुण 423 विद्यार्थी , केंद्र 0182 राजा भगीरथ विद्यालय या केंद्रांवर एकुण 255 विद्यार्थी
परीक्षा केंद्र 209 वसंतराव नाईक इस्लापूर 247 विद्यार्थी ,परीक्षा केंद्र 213 संत ज्ञानेश्वर इस्लापूर 298 विद्यार्थी,परीक्षा केंद्र 214 शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड 234 विद्यार्थी असे या पाच केंद्रांवर एकुण 1457 विद्यार्थी परीक्षा पेपर देणार आहेत.
परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. परीक्षा केंद्रावर कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत,
तालुका परिरक्षक धनंजय भारती, गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले, शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, योजना प्रमुख जाणते हे परीक्षा विभागाचे काम पाहत आहेत.
या केंद्रावर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश असणार नाही.५० मीटरच्या आत असलेले झेरॉक्स दुकान बंद असतील तसेच केंद्र संचालक वगळता इतर कोणालाही आपला मोबाईल परीक्षा केंद्रात बाळगता येणार नाही अशा सूचना दिल्या आहेत.
- सोपान बोंपीलवार हिमायतनगर
