धानोरा येथील एकनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा प.पू.बालयोगी व्य़ंकटस्वामी महाराज यांच्या शुभहस्ते हस्ते

हिमायतनगर प्रतिनिधी / : तालुक्यातील धानोरा ज. येथील एकनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा १४ फेब्रुवारी रोजी दत्त संस्थान पिंपळगावचे तपस्वी व्यंकटस्वामी महाराज यांच्या हस्ते होणार आहे या कलशारोहण सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
   धानोरा ज.येथे असलेल्या श्री एकनाथाचे मंदिर आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून एक दिवस भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावर्षी श्री एकनाथ मंदिराचा कलशारोहण निमित्ताने दि.13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता श्री एकनाथ मंदिराच्या कलशाची भव्य मिरवणूक भाविक भक्तांच्या सहभागाने टाळ मृदंगाच्या गजरात गावातील मुख्य रस्त्याने निघणार आहे. 

दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:31 या वेळेत श्री एकनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा प.पू.बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे.कलशारोहण नंतर दुपारी 12 ते 2 या वेळेत महंत साध्वी श्रीहरी भक्तीपारायण मुक्ताई नाथ माऊली यांचे जाहीर किर्तन होणार आहे. किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यास खासदार नागेश पाटील आष्टीकर, आ. बाबुराव कदम कोहळीकर, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थीत राहावे, असे आवाहन धानोरा ज येथील ग्रामस्थांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.