हिमायतनगर तालुक्यातील पिचोंडी शिवारात शुक्रवारी वि.आर.क्रशरचे उद्घाटन आ.भिमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर,टायगर गृपचे बाळूभाऊ जाधव, भास्कर कदम कोहळीकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर दहिफळे, भाजपचे सुधाकर भोयर,माजी नगराध्यक्ष बालाजी मच्चेवार , अशोक नेम्मानिवार ,यांची उपस्थिती होती.या क्रेशरचे उद्घाटन सोहळ्यात प्रथमता आ.केराम ,माजी आ.जवळगावकर यांचा सत्कार क्रेशरचे संचालक रवि चव्हाण,रमन औद्दीवार, शंकर मानकर, मनोज जाधव यांनी सत्कार केला.या उद्घाटन सोहळ्यात बोलताना आ.केराम म्हणाले की ग्रामीण भागातील व्यवसाय करीत असतांना अडीअडचणी ऐत असतात त्या अडचणींवर मात करून तरूणांनी आपल्या उद्योग उंचावण्यासाठी अथक परिश्रम घेऊन यशस्वी उद्योजक बनले पाहिजे असे केराम यांनी व्यक्त केले.माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर बोलताना म्हणाले की या भागात सुरू केलेल्या क्रेशर हे मोठी भरारी घेऊन भविष्यात नावारूपाला येणार असल्याचे सांगितले याप्रसंगी कांग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, पत्रकार काशिनाथ शिंदे,माजी संचालक शेख रफीकभाई, माजी उपसभापती गजानन कोल्हे, यांच्यासह किनवट बाजार समिती सभापती,संचालक, शिवसेना तालुकाप्रमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील उद्योग उंचावण्यासाठी तरूणांनी परिश्रम घेतले पाहिजे - आ.भिमराव केराम
0
February 07, 2025
हिमायतनगर प्रतिनिधी/ ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योग व्यवसायात भरारी घेतली पाहिजे कुठल्याही क्षेत्रात आपले ध्येय मोठे ठेवून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन आ.भिमराव केराम यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
