राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्येमुळे स्वर्गातुन गंगा पृथ्वीतलावर आली - प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज

हिमायतनगर प्रतिनिधी/ हिंदू पुराणातील एक धर्मनिष्ठ व दानशूर राजा, सूर्यवंशातील म्हणजेच इक्ष्वाकुवंशातील या राजाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तप केले सगर राजे एकत्र ऐऊन सगराने पृथ्वी खोदली म्हणून सागर झाला ,सगराच्या राज्यात जन्माला आले .अंश्वमान हा भाग्यवान होता. माझ्या पुर्वजनाचा उध्दार कशाने होईल तेंव्हा गंगेच्या पर्वतावर योग्य प्राप्त केले. स्वर्गामधील गंगा पृथ्वीवर आण्याकरीता पूर्वजांच्या उध्दार करण्यासाठी गंगा पृथ्वीवर आणली राजा भगीरथाने साधना केली .
स्वर्गामधे राहणारी गंगा मृत्यू लोकांमध्ये यावी लागली भौलेनाथान गंगेच्या रुपाने साध्य केले. राजा भगीरथाने साठ हजार पुर्वजांचा उध्दार भगीरथाने केला. विश्वाची पवित्र नदी गंगा पृथ्वीवर राजा भगीरथामुळे आली असल्याचे किर्तनकार प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी सांगितले.
कारला येथील राजा भगीरथ मंदिर येथे भव्य जयंती सोहळ्याचे आयोजन सगरवंश मंडळ व बेलदार समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. प्रथमता राजा भगीरथाचा अभिषेक कमिटीच्या वतीने करण्यात आला जयंती निमित्त प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.या जयंती निमित्त किर्तन सोहळ्यात भाविकांना राजा भगीरथाचा जिवनावर किर्तन झाले ते म्हणाले की इंद्रीयाच्या अधीन राहून जिवन जंगलात तर जन्मोजन्मीची भुक वाढणार आहे भगवान गोपाल कृष्णाने गायी सांभाळल्या होत्या प्रत्येक शेतकऱ्यानी एक तरी गायीच पालन करून रक्षण केले पाहिजे मानव म्हणून जन्माला आलो आहोत देव धर्माच रक्षण करा
मन स्थिर ठेवून भक्ती करा ,प्रत्येक भक्तांनी गाय पाळा तीची सेवा करा आपण जर गायीवर दया केली नाही गो हत्या वाढेल प्रत्येकाच्या घरातील गाय आणि माय खुश त्यांना आत्महत्या करण्याची गरज नाही जिवनात गाय माय धर्म पाळा कितीही मोठे व्हा तिन गोष्टी पाळा असेही म्हणाले भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी पुण्य कर्म करून, पापे दूर करून शतकानुशतके मोक्ष मिळवून देण्यासाठी गंगा आणली होती, त्यानंतर गंगेने मानवाच्या अनेक पिढ्यांचे रक्षण केले आणि हे सर्व भगीरथाच्या कठोर तपश्चर्येमुळे शक्य झाले.राजा भगीरथ हे अयोध्येचे इक्ष्वाकू वंशाचे राजा होते असे बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी सांगितले किर्तनाची सांगता दहिहंडी काल्याने झाली  तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला किर्तनामध्ये तबल्याची साथ  सचिन बोंपीलवार,मृदंगाचार्य माने, गायणाचार्य ह.भ.प.लक्ष्मण महाराज मंदेवाड , सिबदरा येथील भजनी मंडळ होते जयंती सोहळ्याचे आयोजन सगरवंश मंडळ व बेलदार समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.पंचक्रौशितील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.