हिमायतनगर प्रतिनिधी/ राज्यभर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतिने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन बुधवारी शहरातील परमेश्वर मंदिर प्रांगणात दि.15 जानेवारी रोजी करण्यात आले या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन दिवसभरात तब्बल 151 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
हिमायतनगर येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या सेवा समिती कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करून ग्रामीण भागातील नागरीकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.बुधवारी सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटनापुर्वी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन परमेश्वर मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, डॉ राजेंद्र वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर सांप्रदाय समिती सिस्य मंडळ तसेच शहरासह ग्रामीण भागातील युवक, महिला,पुरुष, मुस्लिम बांधवांनी देखील सहभागी होऊन रक्तदान केले आहे.हिमायतनगर शहरात प्रथमच दिवसभरात 151 रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असुन प्रत्येक व्यक्तीने रक्तदान देऊन कुणाला तरी जिवदान देण्यासारखे असल्याचे महाविरचंद श्रीश्रीमाळ म्हणाले व परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीकडून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज सांप्रदाय समिती च्या पदाधिकारी आयोजकांना परमेश्वराची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.रक्तदात्यांचे कौतुक केले यावेळी पोलीस निरीक्षक अमोल भगत,संचालक संजय माने, भाजपा अध्यक्ष गजानन चायल, भाजपचे रामभाऊ सुर्यवंशी,वर्हाडे सर ,मारोती पाटील लुम्दे, श्रीनिवास बोंपीलवार, गणेश मुठेवाड,यांच्यासह अनेक भक्त मंडळाची उपस्थिती होती.
