हिमायतनगर येथील पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आराखडा बैठकी व जनता दरबारचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.या बैठकीत प्रथमता नवनिर्वाचित आ.कोहळीकर यांचा पं. स.व तहसील कार्यालयाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार पल्लवी टेमकर,गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव, विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे,टारपे,विशाल पवार, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या बैठकीत अनेक गावच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील समस्यासह पंचायत समिती तहसील कार्यालयात उद्भवणाऱ्या समस्या व अधिकाऱ्यांच्या तक्रारी मांडल्या आहेत.
प्रत्येक गावचा ग्रामसेवक सरपंच यांच्याकडून आढावा घेतला तालुक्यात उन्हाळ्यात पाणी टंचाई करीता नियोजन करावे, ग्रामपंचायत स्तरावरील कामाचे नियोजन करून गावपातळीवरील नागरीकांच्या कामांना प्राधान्य द्या तहसील पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरीकांच्या समस्या सोडवून त्यांच्याशी साम़जस्यांने वागले पाहिजे त्यांच्या कामांना प्राधान्य द्या कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही शेतकऱ्यांच्या काही कामासाठी शासनाचे नियम लावू नये शेतकऱ्यांच्या कामे गतीने करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठिशी असणार असल्याचे आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले आहे.या बैठकीसाठी प्रमुख जि.प.माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख सरसमकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा सदस्य संभाराव लांडगे,बबनराव पाटील कदम,माजी उपसभापती बालासाहेब कदम, सुदर्शन पाटील, रामभाऊ ठाकरे,राजू पाटील,माजी उपसभापती गजानन तुप्तेवार, विकास पाटील देवसरकर,विजय पाटील वळसे,म.जावेद,राम सुर्यवंशी, सदाशिव सातव, सुनिल चव्हाण,फेरोज खुरेशी, संतोष पाटील, यांच्यासह या बैठकीस सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, अभियंता,मंडळाधिकारी , पंचायत समिती तहसीलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
