राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - हदगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणीना आवाहन

हिमायतनगर प्रतिनिधी/ राज्यातील शेतकऱ्यांसह बेरोजगारांचा प्रश्न येणाऱ्या काळात सोडवणार असुन किसान सन्मान निधी, लाडक्या बहिणीचे मानधन वाढवणार असुन त्यासाठी या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले ते आज हदगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार सभेत बोलताना केले आहे.या सभेला लाडक्या बहिणीसह मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   हिमायतनगर येथे शनिवारी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेसाठी सचिन भाऊ साठे,आ.हेमंत पाटील , भोसले महाराज, यांची प्रमुख उपस्थिती होती.या सभेत उबाठा शिवसेनेचे नेते माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. याबरोबरच अनेकांनी कोहळीकर यांना पाठिंबा दिला आहे.सभेच्या सुरुवातीला महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भाषण झाले तदनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की गेल्या मंत्रीमंडळात राज्यातील शेतकऱ्यांसह बेरोजगार तरुणांसाठी सरकारने काम केले आहे भविष्यात देखील माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठी काम करणार असुन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये प्रतिमहिना, राज्य सरकारकडून किसान सन्मान निधी वर्षाकाठी 15 हजार करणार असल्याची घोषणा केली आहे .या सर्व योजना सुरू करून शेतकऱ्यांसह बेरोजगारांचा प्रश्न सोडणार आहे म्हणून माझ्या लाडक्या बहिणीनो हदगाव विधानसभा मतदारसंघातुन बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी दिली असुन यावेळी त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले आहे.या सभेसाठी हिमायतनगर तालुक्यातील मोठ्या संख्येने मतदार महिला पुरुष उपस्थित होते.महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.