हदगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचार सुरू करण्यात आला आहे.हिमायतनगर तालुक्यातील वाडी ताड्यापर्यंत प्रचार करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.शहरासह ग्रामीण भागात गेल्या दहा वर्षांत केलीली विकास कामे समोर ठेवून जवळगावकर आपल्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.शहरातील ग्रामीण रूग्णालय,तसेत चिचोर्डी या भागातील रुग्णांसाठी भव्य असे रूग्णालयाची ईमारत ऊभी केली.यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केलेल्या विकासकामांची पावती आम्ही नक्की या निवडणुकीत देणार असा विश्वास मतदार बोलून दाखवत आहेत.सर्वसामन्य जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळत असुन हिमायतनगर तालुक्याच्या विकासासाठी लढणाऱ्या उमेदवारांना साथ द्यायची आहे असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.
जवळगावकरांना पालकमंत्री करण्याचा मतदारांचा निर्धार... प्रचार दौऱ्यात मतदारांचा उत्साह संचारला ठिकठिकाणी जंगी स्वागत
0
November 08, 2024
