विवेक देशमुख यांची हदगाव,हिमायतनगर, किनवट -जिल्हाप्रमुखपदी निवड आ.हेमंत पाटील यांच्याकडुन सत्कार

हदगाव -हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांना व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आता हदगाव-हिमायतनगर , किनवट- माहूर जिल्हाप्रमुख पदी विवेक देशमुख आणि नांदेड दक्षिण , लोहा कंधार शिवसेना जिल्हाप्रमुख पदी विनय गिरडे यांची वंदनीय हिंदूह्रयद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना देण्यात आले . दोन्ही नवनियुक्त जिल्हाप्रमुखांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या . 
          वंदनीय हिंदूह्रयद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच शिवसेना पक्ष वाढ संघटन मजबुतीकरणासाठी जिल्हा व तालुका स्तरावर प्रमुख जबाबदाऱ्या दिल्या जातात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्वानुसार आजवर शिवसेना कार्य करत आहे . आणि पुढेही करणार यात दुमत नाही . यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे जिल्हा प्रमुख पदाची जागा रिक्त झाली होती त्यामुळे दोन्ही कार्यक्षेत्रातत विवेक देशमुख व विनय गिरडे यांची नियुक्ती करून पक्षवाढीची जबाबदारी देण्यात आली आहे.यावेळी माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर ,जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, युवासेना जिल्हाप्रमुख साई विभूते , माजी सरपंच सुदिन बागल,माजी सरपंच अमोल गोडबोले, माजी नगरसेवक संजय इंजवाड ,माजी नगरसेवक सिद्धार्थ गायकवाड, वैजनाथ देशमुख , प्रभू कपाटे ,प्रदिप हणमंते राजू लांडगे नागोराव गिरडे यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
#vinaygirde #vivekdeshmukh
#shivsena

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.