हिमायतनगर प्रतिनिधी/ हदगाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचार वेगात सुरू झाला असुन या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे वारे जोरात वाहू लागले आहेत.सोमवारी जवळगावकर यांच्या प्रचार सभेत बोलताना डॉ बि.डी.चव्हाण म्हणाले की सर्व बहुजन समाजाला घेऊन चालणार नेतृत्व माधवराव पाटील जवळगावकर असुन एकनिष्ठ राहून समाजाची सेवा करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे म्हणून या निवडणुकीत त्यांना पालकमंत्री करण्यासाठी प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले आहे.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रत्येक कार्यकर्ता गावोगावी मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विजयासाठी अथक परिश्रम घेत आहेत.सोमावारी हिमायतनगर तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचारार्थ बंजारा समाजाचे नेते डॉ बि.डी.चव्हाण यांनी गावोगावी भेटी घेऊन मतदारांना महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले.यावेळी बोलतांना म्हणाले की हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी माधवराव पाटील जवळगावकर यांच नेतृत्व कणखर असुन त्यांच्यामुळे वाडी ताड्यांपर्यंत विकासाची गंगा वाहिली आहे.पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्याने पाचव्यांदा देखील त्यांच्यावर पक्षश्रेष्ठीने जबाबदारी टाकली आहे.म्हणुन प्रत्येक मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करून माधवराव पाटील जवळगावकर यांना पालकमंत्री करण्यासाठी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले आहे.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
