बाऱ्हाळी/प्रतिनिधी ( केशव रापतवार)
देशसेवेसाठी सियाचिन ग्लेशिअर सारख्या बफाळ ठिकाणी कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या हिरानगर येथिल सुपुत्र शाहिद सुधाकर राठोड यांना अमर रहे .. अमर रहे.. सुधाकर राठोड अमर रहे या असमंत घोषणानी दि. २७ नोव्हेंबर रोजी दु. १२.३० वा असंख्य जनसागराच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला .
बाऱ्हाळी येथुन जवळच असलेल्या हिरानगर तांड्याचा सुपुत्र शाहिद सुधाकर राठोड हे लेहमधील सियाचिन ग्लेशियर येथे कर्तव्यावर असताना त्यांना २५ नोव्हेंबर रोजी वीरमरण आले . त्यांचा पार्थिव २६ नोव्हेंबर रोजी हैद्राबाद मार्गे मुखेड येथे आणण्यात आला व दि २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वा मुखेड येथुन पार्थिव हिरानगर येथे आणण्यात आला यावेळी रस्त्यातील प्रत्येक गावातील नागरीकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी करण्यात आली होती बाऱ्हाळी येथे मोठ्या संख्येने नागरीक , सर्व शाळांचे शालेय विद्यार्थी , कर्मचारी , माजी सैनिक , महिला आदीनी दोन किमी पर्यंत दोन्ही बाजुनी पृष्पवृष्टी करत शहीद जवानाचे अंत्यदर्शन घेतले. पार्थिव हिरानगर येथे पोहचताच कुटुंबिय व मित्र परिवाराने अंत्यदर्शन घेतले यावेळी बा -हाळी परिसरातील नागरिकांनी वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसिलदार राजेश जाधव, गट विकास अधिकारी सी.एल रामोड ,उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी , सपोनि भालचंद्र तिडके अमर केंद्रे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आ. डॉ.तुषार राठोड यांच्या मातोश्री चक्रावतीबाई राठोड, सुशांत चव्हाण , व्यंकटराव दापकेकर , बालाजी पा. सकनुरकर, बालाजी सोमावार , पांडूरंग महाजन, राजे छत्रपती ॲकेडमीचे संचालक ज्ञानेश्वर डूमणे , मंडळ आधिकारी संजय जांभळे , तलाठी शिवाजी तोतरे , ग्रामसेवक एम . एम . मणियार आदींसह बा-हाळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते .
