हिमायतनगर प्रतिनिधी/ हदगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांचा पराभव झाल्यानंतर पुन्हा त्यांनी हिमायतनगर शहरात फेरी मारून मतदारांच्या भेटी घेतल्या हार मानून माझ्या जनतेला वाऱ्यावर न सोडता पुन्हा जन सेवेसाठी त्याच जोमाने कामाला लागणार असल्याचे बोलतांना सांगितले आहे.
माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी बुधवारी हिमायतनगर शहरातील मतदार व्यापारी बांधवांच्या भेटी घेतल्या भेटीदरम्यान बोलताना जवळगावकर म्हणाले की विधानसभा निवडणुकीत माझ्या दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केले कुणावर दोष देणार नाही या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना गेल्या दहा वर्षांत जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली.शहरासह ग्रामीण भागातील जनतेला कुठल्याही अडचणी उदभणार नाही याची सातत्याने काळजी घेतली व्यापारी बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास केला नाही ग्रामीण भागातील वाडी ताड्यांपर्यंत मजबूत रस्ते करून दिले शहारात इमारती उभ्या करून वैभव प्राप्त करून दिले यासह अनेक कामे करण्याची मतदार बांधवांच्या आशिर्वादाने आजपर्यंत केली या निवडणुकीत पराभव झाला असुन तोही मान्य केला आहे.
माझ्या जिवनात संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असला तरी त्या सर्व गोष्टीवर मात करून पराभवाची हार न मानता पुन्हा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने काम करणार असुन.माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुढील निवडणुका जिंकण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी आ.जवळगावकर यांनी व्यक्त केले आहे.यावेळी तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुभाष राठोड, जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रकाश वानखेडे, माजी संचालक शेख रफीकभाई, गणेश शिंदे,नगराध्यक्ष अ.आखील , शहराध्यक्ष संजय माने, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश चिलकावार,अ.बाकी, शिवाजी पाटील, दत्ता पाटील, गणेश देवराये,शाम ढगे,हानिफ भाई, सुभाष शिंदे, प्रशांत देवकते,संतोष आंबेकर, प्रविण जाधव , वानखेडे , माने,यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
माधवराव पाटील जवळगावकर हे अतिशय लोकप्रिय आणि मनमिळावू स्वभाव असणार व्यक्तीमत्व आहे.सामान्य माणूस देखील त्यांची भेट घेण्यासाठी धावतो जवळगावकर हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येकाच्या मनात रुजलेले आहे.निवडणुका असो अथवा नसो प्रत्येकाच्या सुखदुःखात साथ देणारे नेतृत्व म्हणून माधवराव पाटील जवळगावकर यांची ख्याती आहे.हिमायतनगर तालुक्यातील वाडी ताड्यांपर्यंतचा सर्वसामान्य नागरीक जवळगावकरांना ओळखतो विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.बुधवारी शहरातील भेटी दरम्यान माधवराव पाटील जवळगावकरांना भेटून अनेकांचे अश्रू अनावर झाले सर्वसामान्य नागरिकांच्या लोकनेत्याचा पराभव जिव्हारी लागला असल्याची भावना व्यक्त केली आहे.
