#नांदेड दि. 27 नोव्हेंबर : राज्यात 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत असून याअंतर्गत 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. ही #गोळी चावून खाणे गरजेचे आहे किंवा पाण्यात घेता येईल. या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अर्धापूर, धर्माबाद, लोहा, मुदखेड, नांदेड व उमरी या तालुक्यांमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. सर्व शाळांमधून अल्बेडॅझोलची गोळी देण्यात येणार असून लहान मुलांना पाण्यातून तर 6 ते 19 वयोगटातील मुलांना चावून खाण्यासाठी सांगण्यात येणार आहे. 4 डिसेंबरला जे वंचित राहिले त्यांना 10 डिसेंबरला ही गोळी दिली जाणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी ही गोळी अतिशय आवश्यक असून शिक्षक, पालक यांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
000
