हिमायतनगर प्रतिनिधी/ गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले जनतेनी निवडून दिल्यानंतर नारळ फोडून आश्वासन दिले नाहीत तर नारळ फोडले ती काम पुर्णत्वास नेली याचा आनंद असुन हिमायतनगर तालुक्यातील उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.जवळगावकर यांनी सांगितले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील धानोरा,जिरोना, महादेव फाटा, वाशी,पार्डी, आंदेगाव यासह विविध ठिकाणी जवळपास पंचवीस कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.सोमवारी धानोरा येथील स्मशानभूमी पाण्याच्या टाकी,सि.सि.रस्ता ,जिरोना कोसमेट, वाशी, सवना येथे आ.जवळगावकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यासह विविध गावच्या अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन प्रसंगी आ.जवळगावकर बोलताना म्हणाले की राजकारण करीत असतात मतदारांना कुठल्याही प्रकारची खोटी आश्वासने दिली नाही जे बोलतो ते प्रत्यक्षात करून दाखवतो म्हणून जनतेनी विश्वास दाखवला त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही भविष्यात विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची कामे करणार असल्याचे आ.जवळगावकर यांनी सांगितले.
यावेळी कांग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष राठोड, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रकाश वानखेडे, सभापती जनार्दन ताडेवाड,संचालक शेख रफीकभाई,ज्ञानेश्वर शिंदे, परमेश्वर गोपतवाड,धानोरा येथील गणेशराव शिंदे,अण्णा शिंदे,शाम माऊली गड्डमवाड, पोलिस पाटील तुळशे,दयाळ गिर गिरी, पर्वतावर काईतवाड, मधुकर ऐनेकर,सवना परमेश्वर गोपतवाड, बळवंत जाधव, बालाजी कदम, सुरेश पळशीकर, योगेश चिलकावार,दिपक कात्रे, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
