हिमायतनगर प्रतिनिधी/ आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचा धडाका गेल्या महिना भरापासुन सुरू कोट्यवधी रुपयांचा विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले असुन आज दिवसभर विकास कामांचे भुमिपुजन उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुभाष राठोड तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी दिली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे वटफळी ते सातशिव मंदिर जोड ,मौजे कांडली खु.अ़तर्ग़त सिमेंट रस्ता व दलीत वस्ती सि.सि.रस्ता, मौजे कांडली ते रेल्वे स्टेशन जोड रस्ता डांबरीकरण अंतर्गत 25/15 दलीत वस्ती सि.सि.रोड ,का़डली खू ,वडगाव गावा अंतर्गत सिमेंट.रस्ता, दाबदरी ते वायवाडी जोड रस्ता डांबरीकरण
दाबदरी ते काळू नाईक तांडा सभामंडप भुमिपुजन , पोटा बु.ते सातशिव मंदिर डांबरीकरण,पोटा बु ते पोटा तांडा डांबरीकरण व दोन वर्गखोली,गाव अंतर्गत सि.सि.रस्ता, पोटा बु ते पारवा खु.डांबरीकरण ,पारवा ते जवळगाव डांबरीकरण , पुल बांधकाम ,अ़तर्ग़त सि.सि.रस्ता. स्मशानभूमी सेड
, पोटा खु . ते पारवा खु.डांबरीकरण,पोटा खु ते वटफळी डांबरीकरण व अंतर्गत सि.सि.रोड , तिन वर्ग खोल्याचे लोकार्पण व पुल बांधकाम, मौजे सिरंजनी गोल्ला गोल्लेवार समाज सभामंडप या कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहेत.हिमायतनगर ग्रामीण भागातील वाडी ताड्यांपर्यंत मजबूत रस्ते करून देण्याचा संकल्प आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचा होता.त्या़च्या कार्यकाळात तो पुर्ण देखील होत आहे.या उद्घाटन सोहळ्यास तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुभाष राठोड तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केले आहे.
