हिमायतनगर प्रतिनिधी/ हदगाव विधानसभा मतदारसंघात कांग्रेस पक्षात अनेक तरुणांना संधी देत कार्यकर्त्यांची मोठी फळी सक्रिय असुन या मतदारसंघाचे नेतृत्व आ.माधवराव पाटील जवळगावकर हे पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करीत आहेत पुन्हा एकदा त्यांनाच आमदार करण्यासाठी कांग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन महाराष्ट्र कांग्रेस प्रभारी मोहन चौधरी यांनी केले आहे
हदगाव येथील कांग्रेस कार्यालयात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कांग्रेस पक्षाच्या बुथ प्रमुखांंची बैठक घेऊन बुथ कमिटीच्या आढावा बैठकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.या बुथ प्रमुख बैठकीसाठी महाराष्ट्र कांग्रेस प्रभारी मोहन चौधरी जिल्हाध्यक्ष बि.आर.कदम, कांग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण,सुभाष राठोड, उपजिल्हा अध्यक्ष डॉ प्रकाश वानखेडे, यांची उपस्थिती होती.उपस्थीत पदाधिकारी यांचा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्कार केला.
या बुथ कमिटीच्या बैठकीत उपस्थित कांग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र कांग्रेस प्रभारी मोहन चौधरी म्हणाले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येका बुथ प्रमुखांनी अतिशय नियोजनबद्ध काम करून आपल्या पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात कांग्रेसमय वातावरण असुन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केलेल्या विकास कामे हेच त्यांच्या कार्याची पावती जवळगावकरांची पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे कांग्रेस पक्ष देखील त्यांच्या पाठीशी खंबीर असुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कांग्रेस कार्यकर्त्यांनी
पक्षातील नवतरुण कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागावे असे आवाहन कुणाल चौधरी यांनी केले या बुथ कमिटीच्या बैठकीत असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
