लोकनेते आ.जवळगावकरांच्या हस्ते हिमायतनगर तालुक्यातील विविध विकास कामांचे आज भूमिपूजन

हिमायतनगर प्रतिनिधी/ लोकनेते आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील विविध गावा अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला असुन सोमवारी दिवसभर विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटी‌ कार्याध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड यांनी दिली आहे.
          आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचा पाच वर्षांचा कालावधी संपत आला असला तरी हिमायतनगर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील गावापर्यंत पक्के रस्ते करण्याचा त्यांचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत.गेल्या आठ दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यात विकास कामांच्या भुमिपुजनाचा धडका सुरुच असल्यामुळे आ.जवळगावकरांच्या कामाचे जनतेतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोमवारी हिमायतनगर तालुक्यातील मौ.धानोरा (ज) अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन सकाळी 10 वा., सवना जिरोना कोसमेट रस्त्याचे भूमिपूजन स.11 वा स्थळ : जिरोना गणेशवाडी महादेव फाटा ते रमणवाडी रस्त्याचे भूमिपूजन वेळ दु.12 वा. स्थळ : महादेव फाटा
दगडवाडी ते वाशी किमी 21 ते 23, 23 ते 24, किमी 24 ते 24.600 वेळ दु.1 वाजता स्थळ : वाशी 
दरेसरसम ते बऱ्हळी तांडा ग्रा भा 53 किमी. 1/200 ते वेळ : दु. 2 वा स्थळ : पार्डी पाण्याच्या टाकीजवळ हिमायतनगर - टेंभी किमी 1 ते 21 वेळ दुपारी 3 वा.स्थळ : पर्डी टेंभी कॉर्नर जवळ
महादेव फाटा ते आंबेगाव पूर्व रस्त्याचे भूमिपूजन दु.3.30 स्थळ : महादेव फाटा आंदेगाव ,आंदेगाव पूर्व पुनर्वस्तीत अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन दु.4 वा. स्थळ : आंदेगाव पूर्व
आंदेगाव ते सरसम रोड दु.4.30 वा. स्थळ : अंदेगाव जुने
 पवना जोड रस्ता भूमिपूजन सायं.5 वा. स्थळ :
 पवना पुनर्वसन गावात अंतर्गत सिसी रस्ता नाली विविध विकास कामाचे भूमिपूजन सायं.5:30 स्थळ : पुनर्वसन पवना या गावातील मुख्य रस्त्याच्या विकासासाठी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असुन त्याचे भुमिपुजन करण्यात येणार आहे.या भुमिपुजन /उद्घाटन सोहळ्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे जिल्हा काँग्रेस कमिटी‌ कार्याध्यक्ष सुभाष राठोड व आवाहन तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.