हिमायतनगर प्रतिनिधी/ ग्रामीण भागातील गाव अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली होती त्या रस्त्यावरून जातांना नागरीकांना कसरत करावी लागत होती गेल्या पाच वर्षांपासून प्रथम त्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून कामे पुर्णत्वास नेली असुन काही रस्त्याचे कामे प्रगतीपथावर असुन ते लवकरच पुर्ण होतील पाच वर्षांच्या कालावधीत ग्रामीण भागातील विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही पुढील काळात देखील जनतेच्या आशिर्वादाने उर्वरित कामे करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी भुमिपुजन प्रसंगी बोलताना केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील तिर्थक्षेत्र बोरगडी ,धानोरा,सेलोडा सिरपली , जवळगाव येथे तलाठी कार्यालय इमारत,यासह विविध गावच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर करून आनला असुन त्या रस्त्याच्या कामाचे आ.जवळगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.
या भुमिपुजन सोहळ्यात आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचा धानोरा बोरगडी ग्रामस्थांनी सत्कार केला.या प्रसंगी बांधकाम विभागाचे तुंगेनवार ,कंधारकर,तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी,शेख रफिकभाई,अ.आखील , डॉ प्रकाश वानखेडे, जनार्दन ताडेवाड,परमेश्वर गोपतवाड, बाला पाटील टाकराळेकर, ज्ञानेश्वर शिंदे, संजय माने, जोगेंद्र नरवाडे,सुरेश पळशीकर,प्रमुख उपस्थिती होती.
या सत्कार सोहळ्यात बोलताना आ.जवळगावकर म्हणाले की या भागातील माझ्या मतदार बांधवांनी गेल्या निवडणुकीत मताधिक्याने निवडून दिले होते.त्यांनी टाकलेल्या विश्वासाला जपून दिलेला शब्द पाळला आणि ग्रामीण भागातील विकास कामांना प्राधान्य दिले पाच वर्षे संपत आले तरी देखील विकास कामे आजपर्यंत सुरू असुन ग्रामीण भागातील रस्त्यासह मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले असुन भविष्यात तालुक्यातील विकासात्मक कामे करण्याचा प्रयत्न आहे जनतेच्या आशिर्वादाने उर्वरित कामे देखील येणाऱ्या काळात पुर्ण करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.यावेळी शिवाजी पाटील, गणेश शिंदे, मदनराव पाटील,नितेश जैस्वाल, ग्रामसेवक गोडबोले,योगेश चिलकावार,अ.बाकी,संतोष आंबेकर,शैलेश पतलेवाड, गणेश आरबटवाड,नाथा खिराडे, ज्ञानेश्वर बेंद्रे, अनिल पाटील, मनोज सेवनकर,दिपक कात्रे, संदीप तुप्तेवार, यांच्यासह कांग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
