हिमायतनगर तालुक्यातील तिर्थक्षेत्र बोरगडी, धानोरा अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली होती.बोरगडी, धानोरा,वारंगटाकळी या भागातील नागरीकांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे मुख्य रस्त्याचे काम करण्याची मागणी केली होती.आ.जवळगावकर यांनी या भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सदरील रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असुन गुरुवारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.
यासह जवळगाव येथे तलाठी कार्यालयाची भव्य इमारत होणार असून या इमारतीचे भुमिपुजन करण्यात येणार आहे.तसेच सेलोडा सिरपली गावच्या डांबरीकरण.रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे.गुरूवारी हिमायतनगर तालुक्यातील दिवसभर विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार असून या भुमिपुजन सोहळ्यास तालुका काँग्रेस कमिटी, युवक शहर काँग्रेस, सेलचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुभाष राठोड, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, यांनी केले आहे.
