हिमायतनगर प्रतिनिधी /गावाच्या विकासासाठी सरपंच, ऊपसरपच ग्रा प सदस्य बांधवांनी गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहत असताना शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी दक्ष राहावे असे आवाहन गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांनी केले.
तालुक्यातील सवना ज या गावी गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव,प.स.विस्तार अधिकारी प्रमोद टारफे, सुशीलकुमार शिंदे यांनी ९सप्टेबर रोजी भेट दिली होती.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . यावेळी पुढे बोलताना गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव म्हणाले की, आपल्या गावात शासनाच्या योजनेची प्रभावी पुणे अंमलबजावणी केली तर आपल्या कार्यकाळातील सामान्य वर्गांना कायम आठवण राहणार आहे. मानवाच्या जीवनात आपल्या कर्तृत्वाची कायम आठवण राहणार आहे. ग्रा प ला स्वतंत्र इमारतीसाठी वरीष्ठाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.आपल्या गाव पातळीवर व्यवस्थीत कामे कसे होतील यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन केले.याप्रसगी सरपंच, ऊपसरपच ग्रा प सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.
