हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या - महाविकास आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा शेतजमिनी खरडून गेल्या असुन कापसासह सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
      हिमायतनगर तालुक्यातील दि.1 सप्टेंबर पासून सतत दोन दिवस अतिवृष्टी सदृश पाऊस होऊन शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या आहेत.पैंनगंगा नदीकाठासह नाल्यांना पुर वाहून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.सदरील शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी कृषी मंत्री यांच्याकडे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत देण्याची मागणी केली.दि.9 सप्टेंबर रोजी तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजारांची मदत, पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेले त्यांना मदत, निराधार व दिव्यागांचे थकीत अनुदान देण्यात यावे, घरांची पडझड झाली त्यांना पन्नास हजारांची मदत,पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तात्काळ 25 टक्के अग्रीम विमा यासह आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.यावेळी तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटी‌ कार्याध्यक्ष सुभाष राठोड, माजी नगराध्यक्ष अ.आखील , जोगेंद्र नरवाडे,
ज्ञानेश्वर शिंदे, संजय माने, राजेश्वर बलपेलवाड, नितेश जैस्वाल, अशोक शिरफुले,उतम राठोड,अ.बाकी,मोहन ठाकरे, संतोष बनसोडे, दिलीप पाटील, सुभाष शिंदे, जयवंत पाटील, प्रकाश माने, गोविंद बंडेवार,श्रीदत्त पाटील,पंडीत ढोणे, अश्रफ खान,रामराव पाटील,भारत इंगळे यांच्यासह तालुका कांग्रेस कमिटी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.