हिमायतनगर प्रतिनिधी /तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत च्या लाभधारकांना वेळेवर निधी मिळावा यासाठी वरीष्टाच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे कर्मचारी, ग्रामसेवक सुटिच्या दिवशी महालक्ष्मी पुजन च्या दिवशी देखील काम करीत असल्यामुळे वेळेत तालुक्यांचे उदिष्ट पुर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्याला गाव वाईज उदिष्ट दिले आहे.जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मंजूषाताई कापसे, गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत चे विस्तार अधिकारी प्रमोद टारफे, सुशीलकुमार शिंदे, विशाल पवार, स्वप्नील भद्रे, वैभव नाईक, वसंत सोनटक्के,गोविंद शिरगीरे, ग्रामसेवक नारायण काळे,व्यंकटेश जानकर, भिमराव ठमके,शेख मजहर हे गेल्या तिन दिवसां पासून सदर लाभार्थ्यांची नांवे आॉन लाईन करण्यासाठी आपले कर्तव्य पार करीत आहेत.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महालक्ष्मी दिनी ११ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली असली तरी देखील सदर कर्मचारी वर्गांनी वरीष्टाधिकारी यांच्या आदेशानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेवर लक्ष्मी येऊन घरकुलाचे कामे सुरू होण्यासाठी कामे करत असल्याचे दिसून येत आहे.
या कामी तालुक्यातील सरपंच, ऊपसरपच बाधवासह ग्रामसेवक वर्गानी देखील जागरूक राहून आपले कर्तव्य बजावले आहे.शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणी साठी येथील गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव शासनाच्या आदेशानुसार वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचा कारभार सुरळीत पणे करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.प्रधानमत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे कागदपत्रे वेळेवर मिळावे म्हणून अनेक गावी ग्रा प ला भेट देऊन जनजागृती केली आहे.
तालुक्याला मिळालेले प्रधानमंत्री योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पं.स.चे गृहनिर्माण अभियंता यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभले असुन पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्वप्निल भद्रे यांनी सांगितले.
