हिमायतनगर प्रतिनिधी/ कृषी विभागाच्या राज्य योजना सोयाबीन योजनेच्या आँनलाईन सोडतीत बॅटरी संचलित फवारणी पंपा करीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयात फवारणी पंपांचे कृषी सहायक एम.एन.लोखंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या राज्य योजना सोयाबीन योजनेच्या आँनलाईन सोडतीत बॅटरी संचलित फवारणी पंप योजनेकरीता शेतकऱ्यांनी आँनलाईन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते.
कृषी विभागाने दिलेल्या तारखेच्या आत आँनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड यादी तालुका कृषी कार्यालयास प्राप्त झाली त्यानुसार शुक्रवारी तालुका कृषी कार्यालयात आँनलाईन सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना बॅटरी संचलित फवारणी पंप वाटप करण्यात आले आहे.
तालुका कृषी अधिकारी जाधव, कृषी सहायक एम.एन.लोखंडे ,बि.डी.माजळकर , कृषी सहायक स्वाती बेहरे ढगे , रामदास बोंपीलवार,संचालक धर्मराज शिरफूले,ग्रा.पं.सदस्य सोपान बोंपीलवार, अविनाश पाटील लुम्दे,चंद्रकांत घोडगे, तुकाराम कदम, राजेश्वर लुम्दे,वैजनाथ यमजलवाड,अगंद सुरोशे, सुरेश चप्पलवाड, सुरेश कदम,विजय मोरे, संभाजी सुर्यवंशी,
यांच्यासह कारला,खडकी सह तालुक्यातील शेतकऱ्यांनी फवारणी पंप घेण्यासाठी गर्दी केली होती.
