गणेश भक्तांनी विसर्जन शांततेत आनंदाने साजरे करून प्रशासनाला सहकार्य करावे -आ जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ गणेश उत्सवा दरम्यान गेल्या सात दिवसांपासून शहरातील गणपती मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक धार्मिक स्पर्धा आयोजित करून शांतपणे उत्सव साजरा केला आनंद घेतला त्याच पध्दतीने गणेश भक्तांनी गणपती विसर्जन देखील शांततेत करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी गणपती दर्शन प्रसंगी केले आहे.

           आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी रविवारी श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन हिमायतनगर शहरातील सर्व गणपती मंडळाना भेटी दिल्या व मनोभावे गणपती दर्शन घेतले यावेळी ठिकठिकाणी गणेश मंडळांच्या वतीने आ.जवळगावकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित गणेश भक्तांशी बोलताना आ.जवळगावकर म्हणाले की गणेश उत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, हिमायतनगर शहराची गेल्या अनेक वर्षापासूनची गणेश उत्सवाची शांततेची परंपरा कायम ठेवावी प्रत्येक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: होवून नियम पाळले तर शांततेचा भंग होणार नाही. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून उत्सव आनंदाने साजरे करावेत गणेश विसर्जन शांततेत करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.