बजरंग चौकातील हनुमान मंदीराच्या विकासासाठी कमी पडणार नसल्याची खासदार, आमदारांची ग्वाही!

हिमायतनगर प्रतिनिधी /शहरातील बजरंग चौकातील पवनसुत हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करुन मुर्तीची प्रतिष्ठापना धार्मिक मय वातावरणात हर्षोल्लासात संत महंतासह विधीवत मंत्रोच्चारात १६ सप्टेंबर रोजी वसमत येथील मठ संस्थान श्नी दिगंबर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. येथील हनुमान मंदिराच्या बाजुला विदमान खा नागेश पाटील आष्टिकर यांनी आपल्या आमदारकीचा कालावधीत एक सभागृह दिले होते.माजी खा हेमंतभाऊ पाटील यांनी विस लाखांचा निधी तर आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी १० लाखांचा निधी दिला होता.या कार्यक्रमासाठी ख नागेश पाटील आष्टिकर आ माधवराव पाटील जवळगावकर यांची ऊपस्थीती होती.मदिर संस्थान सह पवनसुत गणेश मंडळांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहाराने संतोष गाजेवार, गजानन मुत्तलवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसगी बोलताना खा आष्टिकर म्हणाले की, मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक देण्याची घोषणा करीत मंदिराच्या कलशा रोखण्यासाठी वैयक्तिक सहकार्य करण्याचा शब्द दिला.आ.जवळगावकर म्हणाले की, बजरंग चौकातील पवनसुत हनुमान मंदिर कमिटी सह आपण सर्व स्थानिक युवक तरुणांनी ज्येष्ठांच्या सहकार्यातुन माता भगिनींच्या मदतीतुन भव्य असे मंदिर उभारले आहे.मागील प्रमाणेच पुढील कळशा रोहणासाठी निश्चितच जवळगावकर परीवाराकडुन सहकार्यासाठी कमी पडणार नाही.मदिराच्या गाभाऱ्यात सुशोभीकरणासाठी एक किलो चांदी,गेट देण्याचे आश्वासन दिले. हनुमान मंदिराच्या समोरच शिवलिंगाची स्थापना करण्यात आली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ऊप अभियंता देवेंद्र तुंगेनवार, शाखा अभियंता मारोतराव डांगे, शासकीय गुत्तेदार सुरेशअण्णा पळशीकर, विठ्ठल ठाकरे,संतोष भिंगोरे, गजानन मनमदे ज्ञानेश्वर कोरडे,हसन पेंटर, राजीव पिंपळे, विष्णू रामदिनवार, मधुकर चिटेवाड, संजय रामदिनवार,राम शिंदे यांचा देवस्थान च्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भुजंगराव पाटील नदगावकर,महावीरचद श्नीश्नीमाळ, प्रभाकर मुधोळकर, गोपाळ गोजे, विनोद हामने , शशीकांत माळोदे, पदाधिकारी यांच्या सह बजरंग चौकासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.महाप्रसादाने कार्यक्रमांची यशस्वी सांगता झाली.सचलन परमेश्वर गोपतवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बजरंग चौकातील पवन सुत गणेश मंडळ, पवनसुत हनुमान मंदिर कमिटीसह युवक, तरुण वर्गांनी परीश्नम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.