हिमायतनगर प्रतिनिधी/ सगरवंश गणेश मंडळांची शांतता संयम कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून सामाजिक धार्मिक सांस्कृतिक भक्तीमय वातावरण गणेश उत्सव साजरा करीत विसर्जन देखील थाटात पार पाडले त्यांचा आदर्श घेऊन ती परंपरा कायम ठेवून गावचा नावलौकिक मिळवावा असे प्रतिपादन सरपंच गजानन कदम यांनी केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळ,सगरवंश गणेश मंडळ, स्वराज्य गणेश मंडळांच्या वतीने गणपती बाप्पा बसविण्यात आले होते.दोन्ही गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक सगरवंश गणपती मंडळाच्या वतीने गाव नगरभोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते होते.तदनंतर गावातून भव्य गणेश विसर्जन मिरवणूक शांततेच्या वातावरणात काढण्यात आली यावेळी पोलीस कर्मचारी टोकलवाड यांचा सरपंच गजानन कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना सरपंच कदम म्हणाले की गणेश उत्सवातून गावातील सर्व समाजाची एकजूट दिसून येते याबरोबरच गावची अख्यायिका असलेली शांततेची परंपरा जोपासण्याचे काम सगरवंश गणेश मंडळांनी काम केले आहे.या बरोबरच सार्वजनिक गणपती मंडळाने देखील शांतता ठेवून उत्सव साजरा केला असल्याचे सरपंच गजानन कदम म्हणाले यावेळी पोलीस पाटील साईनाथ कोथळकर, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ गफार, दत्ता चिंतलवाड,केशव रासमवाड, रामराव लुम्दे,गोपीनाथ लुम्दे,सुरेश चप्पलवाड, लक्ष्मण ढाणके, जनार्दन मुठेवाड, रमेश चिंतलवाड, अशोक चपलवाड, रामदास इटेवाड,राजेश ढाणके, कृष्णा चिंतलवाड,अशोक आचमवाड,संतोष रासमवाड, जांबुवंत मिराशे, संदीप चप्पलवाड,तुकाराम कदम, विठ्ठल आचमवाड, वैजनाथ यमजलवाड, केदार ताटेवाड,बालाजी कदम,माधव यमजलवाड, आनंद सुर्यवंशी, वसंत मिराशे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थित होती.
