महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेड विमानतळावर आगमन

नांदेड प्रतिनिधी /दि. 4 सप्टेंबर : महामहिम राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांचे श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे भारतीय वायुसेनेच्या विमानाने सकाळी 10.25 वाजता आगमन झाले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, कमांडिग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव आदींची उपस्थिती होती.

विमानतळावरुन राष्ट्रपती महोदया यांनी उदगीर येथील नियोजित कार्यक्रमासाठी 10.35 वाजता वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने प्रयाण केले.
00000 
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Maharashtra DGIPR Girish Mahajan Abhijit Raut

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.