हिमायतनगर प्रतिनिधी/ शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वडगाव ज गावालगत असलेल्या पुलास पुर आला असुन या पुलाचे पाणी गावात शिरले होते.जिल्हा परिषद शाळेसह काही घरांमध्ये पाणी शिरले असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही या पुलाच्या पाण्यामुळे अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत.या पुलास उंची वाढवून बांधकाम करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे परंतु प्रशासकीय अभियांत्याच्या अहवालामुळे काम सुरू झाले नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वडगाव ज असुन मुख्य रस्त्यावरून दोन कि.मी.गाव वस्ती आहे.या गावालगत मोठा नाला वाहतो या नाल्यावरून नागरीकांना जाण्यासाठी पुल आहे.परंतु सदरील पुल खचला असल्यामुळे मुसळधार पावसामुळे या पुलाचे पाणी गावात प्रवेश करीत आहे.त्यामुळे नागरीकांना जिव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलावरून जातांना एका शेतकऱ्याचा वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.यासह अटो वाहून गेला अशा अनेक घटना घडत असताना अद्यापही प्रशासनाने या पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली नसल्यामुळे शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा वडगाव गावात पाणी शिरले असून नागरिकांचा संपर्क तुटला आहे.शाळेपर्य़त पाणी आले असुन अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.
या पुलास मंजुरी मिळाली असली तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काम सुरू झाले नाही त्यामुळे आम्हा गावकऱ्यांना पुन्हा पावसामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य गोविंद खुणे यांनी सांगितले शासनाने तातडीने काम सुरू करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
