सक्षम पिढी घडविण्यासाठी गुरुजींचे कार्य फलदायी ठरते.... खा नागेश पाटील आष्टिकर

 
हिमायतनगर प्रतिनिधी ,(सोपान बोंपीलवार)
ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया आजही मजबूत असल्याचे पाहावयास मिळाल्यामुळे मनस्वी समाधान झाले असून गुरुजी च्या कर्तबगारी वरच विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.सरसम बु प्रमाणेच ईतर शाळेच्या शिक्षक बांधवांनी आपल्या कर्तृत्वाची सातत्याने आठवण ठेवून काम केले तर आजचा आपला विद्यार्थी उद्याचा भावि आधारस्तंभ कायम आठवण ठेवल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना केले.

 तालुक्यातील सरसम बु येथील कै श्नीधरराव देशमुख विद्यालयातुन दहाव्या वर्गातुन सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी हातभार लागावा या उदात्त हेतूने कै अर्पणाताई शामराव देशमुख यांच्या स्मरणार्थ सौ विशाखाताई देशमुख ,दत्ताबापु देशमुख यांच्या कडून रोख एक लाख रुपये देऊन गौरव करण्याचा दुसऱ्या वर्षीचा १५ आगस्ट रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावर्षी विद्यालयातुन प्रथम आलेली कु श्नध्दा गजानन वानखेडे यांना एक लाखांचा धनादेश देऊन आई वडीलांसह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.विद्यालयातुन द्वितीय आलेल्या कु श्नुतिका किशनराव मोरे यांचा संस्थेच्या वतीने ११ हजार रुपये देऊन वडीलासह गौरव करण्यात आला.तिसरी आलेली विद्यार्थ्यीनी कु. अतुजा कांबळे यांना संस्थेच्या वतीने ५ हजार रुपये, नवोदय मध्ये ऊतीर्ण झालेला विद्यार्थी वैभव नखाते यांचा ही वरील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा नागेश पाटील आष्टिकर तर ऊदघाटक म्हणून आ माधवराव पाटील जवळगावकर यांची ऊपस्थीती होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शामरावजी देशमुख सरसमकर,व्याख्याते शिवाजी राजे पाटील नरवाडे,दत्ताबापु देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, वसंत साखर कारखान्याचे चेअरमन अजयराव देशमुख, सरपंच सौ काशीबाई ठाकुर, ऊपसरपच अँड अतुलभाऊ वानखेडे, डॉ प्रकाश वानखेडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप करताना खा नागेश पाटील आष्टिकर म्हणाले की, गुरुजी च्या हाती भावि पिढिचे जीवनमान उंचावण्याची फार मोठी जबाबदारी आहे. आपल्या संस्था चालकासह मुख्याध्यापक, शिक्षकवृंद प्रामाणिक पणे आपले कर्तव्य बजावत असल्यामुळे विद्यालयाचा निकालाचा चढता आलेख दिसत आहे.पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी देखील विद्यार्थीनीं मानकरी ठरल्याचे कौतुक खा आष्टिकर यांनी करीत विद्यार्थ्यांनी देखील आपण शिक्षणात मागे पडत असल्याची जाणीव ठेवून विशेष लक्ष द्यावे असे आवाहन केले. 

 ......ऊदघाटन पर बोलताना आ माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की,
कै. श्नीधरराव देशमुख विद्यालयाचे अध्यक्ष शामरावदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येथील मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी यांच्या सह शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे संस्कार चांगले रुजवली जात असल्याने ग्रामीण भागातील आपल्या येथील विद्यार्थी शहरातील विद्यार्थ्यांची बरोबरी करीत आहेत. भविष्यात सदर विद्यालयाच्या हितासाठी खासदार नागेश पाटील आष्टिकर, आणि मी सदैव आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. आपली गुणवत्ता दिवसेंदिवस झेप घेत असल्यामुळे आपल्या विद्यालयात ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया आजही मजबूत असल्याचे पाहावयास मिळत असल्याने मनस्वी समाधान वाटत आहे.विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा वाढावी या उदात्त हेतूने दरवर्षी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये बक्षीस देण्याची प्रथा दत्ताबापु देशमुख,सौ विशाखाताई देशमुख यांच्या ऊपक्रमाचे आ जवळगावकर यांनी कौतुक केले. व्याख्याते शिवाजी राजे पाटील यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थी -पालक आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन टाकले होते.प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष शामरावजी देशमुख सरसमकर यांनी आमदार खासदार या जोडीच्या दुसऱ्या पिढीने आपल्या सोबत सदैव सहकार्याची भावना ठेवल्याबद्दल त्यांच्या कामांचे कौतुक केले. संस्थेच्या वतीने हा उपक्रम चिरकाल चालणार असल्याची ग्वाही दिली. संचलन मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी यांनी केले.सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ ज्योतीताई प्रतापराव देशमुख, विक्रांत देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ नखाते,काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष राठोड, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील टाकराळेकर, अवधुत पाटील देवसरकर, शिवाजी माने, साईनाथ सुर्यवंशी, संजय पाटील दुधडकर, ग्रामसेवक मारोतराव कोंडामगल, सुनील वानखेडे, साईनाथ शिंदे, दत्तात्रय पवार सोनारीकर,जी प शाळेचे मुख्याध्यापक पालक यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रांत देशमुख, मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी, शिक्षक शिरफुले, कळसे,श्नीमती मोरलवार,श्नीमती मिराशे, जिंकलवाड यांच्या सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. *चौकट* विद्यार्थ्यांलयातुन दुसऱ्या आलेल्या विद्यार्थ्यांनीसाठी पुढील शिक्षणासाठी लागणारी पुस्तके देणार...दत्ताबापु देशमुख... विद्यालयातुन काही पॉईंट मुळे दुसरी आलेली विद्यार्थ्यांनी कु श्नुतिका किशनराव मोरे हीस बक्षीस घेतांना डोळ्यांतुन आश्नू आवरता आले नाही.आई चे क्षेत्र हरवलेली श्रुतिका मोरे यांच्या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.हुशार असुन विद्यालयातुन प्रथम येण्याची संधी काही पॉईंट मुळे हुकल्याचे लक्षात घेऊन संस्थेचे सचिव दत्ताबापु देशमुख यांनी पुढील शिक्षणासाठी पुस्तके देणार असल्याचे जाहीर करून श्रुतिका मोरे ना ध्येय डोळ्यांसमोर ठेवून प्रयत्न करा भविष्यात यश मिळुन अपेक्षा पूर्ण होतीलच असा धीर दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.