हिमायतनगर प्रतिनिधी/ कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून गावची सुरक्षा अबाधित राहील याची जबाबदारी सर्वांचीच असुन गावातील सण, उत्सव एकत्रित साजरे करून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता प्रत्येकांनी ठेवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी कारला येथील भेटी दरम्यान केले आहे.
हिमायतनगर तालुक्यात ग्राम सुरक्षा लद स्थापनेसाठी पोलिस निरीक्षक अमोल भगत गावोगावी भेटी देत आहेत.दि.18 रोजी कारला येथे सायंकाळी भेट दिली आहे यावेळी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांचा सरपंच गजानन पाटील कदम, पोलिस पाटील साईनाथ कोथळकर, तंटामुक्त अध्यक्ष डॉ गफार यांनी सत्कार केला.या बैठक दरम्यान उपस्थित गावातील तरुणांनी अवैध देशी दारू यासह समस्या पोलिस निरीक्षकांसमोर मांडल्या आहेत.या प्रसंगी बोलताना पोलिस निरीक्षक भगत म्हणाले की गावात शांतता ठेवून प्रत्येकांनी आपल्या गावचे नावलौकिक मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा त्याबरोबरच सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन सण उत्सव साजरे करावेत कुठेही गालबोट लागणार नाहीत यांची दक्षता घ्यावी तरुणांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपले ध्येय गाठण्याची जिद्द कायम ठेवावी गावात शांतता ,कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता प्रत्येकांनी घ्यावी याबरोबरच गावात काय धंदे सुरू कोण काय करतेय याची माहिती आम्ही घेत आहोत लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीस गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
