हिमायतनगर प्रतिनिधी/ रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वत्र बहिण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा करीत असते परंतु जनतेच्या रक्षणाच्या सेवेत असणाऱ्या पोलिस बांधवांना शहरातील राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल च्या चिमुकल्या विद्यार्थीनींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला आहे.
हिमायतनगर शहरातील राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल च्या चिमुकल्या विद्यार्थीनींनी रक्षाबंधन निमित्त स्वता घरी राखी तयार करून घेऊन आपल्या शाळेतील भाऊ गुरूजींना राखी बांधली आहे.याबरोबरच आपल्या सेवेसाठी रात्र दिवस ड्युटीवर राहून बंदोबस्त तैनात ठेवतात त्या भावांना देखील रक्षाबंधन साजरा केला पाहिजे हा हेतू ठेवून थेट पोलिस ठाण्यात जाऊन राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल च्या विद्यार्थीनींनी पोलिस निरीक्षक अमोल भगत सह पोलीस ठाण्यातील उपस्थित पोलिस बांधवांना राखी बांधून मिठाई देत रक्षाबंधन उत्साहात साजरा केला आहे.यावेळी पोलिस निरीक्षक अमोल भगत म्हणाले की या वयातील मुलींना देश सेवा करणाऱ्यांची आठवण झाली ही अतिशय आनंदाची बाब असुन राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल च्या शिक्षकांचेही कौतुक केले.याप्रस़गी अविनाश बोंपीलवार, बजरंग गुड्डेटवार,
अर्जुन सोमागारी, पांचाळ, सौ. रेवती सोमागारी, अजय जाधव, श्री. सतीश शर्मा, सौ. वंदना पंडित, सौ.पुष्पा राठोड, सौ. भाग्यश्री शिंदे अमोल उमीनवाडे,कलाने, श्री. बोडके, कानकाटे, सौ. सविता माने, सौ. श्वेता बोंपीलवार, सौ. मयुरी पार्डीकर सौ. रायेवार,सौ.बंडेवार उपस्थित होते.
