या प्रसंगी बोलताना आ.जवळगावकर म्हणाले की कांग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्यासाठी अनमोल असुन प्रत्येकाचे प्रेम माझ्यावर आहे.येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी पुढाकार घेऊन आपल्यातील गटतट विसरून एकजुटीने काम करावे माझ्याकडून आपली कामे राहिली असतील ती देखील करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा कामाला लागावे असे आवाहन केले तसेच तालुक्यात ग्रामीण भागातील वाडी तांड्यापर्यंत मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या याबरोबरच शहरात विकासात्मक कामे केली.आदीवाशी शालेय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची इमारत, खेळाडू करीता क्रीडा संकुल यासह महत्वाची कार्यालय तालुकास्तरावर मंजूर करण्यासाठी यश मिळाले भविष्यात आणखी तालुक्याच्या विकासासाठी विकासात्मक कामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले.यावेळी तहशिलदार पल्लवी टेमकर, बांधकाम इंजि.तुंगनवार, डेप्युटी इंजि. कलिन,ता.क्रिडाधिकारि संजय बेतावार, हदगावचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील,ता.काॅ. अध्यक्ष गजानन सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष माजी जि.प. सुभाष राठोड, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. प्रकाश वानखेडे, शहराध्यक्ष संजय माने,सभापती जनार्दन ताडेवाड, माजी नगराध्यक्ष अ.आखील, संचालक शेख रफीकभाई, परमेश्वर गोपतवाड,समद खान, जोगेंद्र नरवाडे,प्रवतराव काईतवाड,शिवाजी माने, प्रल्हाद पाटील,फेरोज खान,शिवाजी पाटील , बाला पाटील, नितेश जैस्वाल, संतोष आंबेकर, योगेश चिलकावार, अश्रफ खान, श्रीदत्त पाटील, बाळू पाटील सुर्यवंशी,संजय पाटील,रोशन धनवे,दयाळगिर गिरी, अशोक आनगुलवार, लक्ष्मण कदम, बापुराव आडे,राजू पाटील, गजानन पाटील मिराशे, पापा पार्डीकर, प्रविण कोमावार, यांच्यासह तालुका कांग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच,उपसरपंच, चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपसातील गटतट विसरून एकजुटीने कामाला लागावे - आ.जवळगावकर हिमायतनगर शहरातील 17 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
0
August 14, 2024
