हिमायतनगर प्रतिनिधी/ हिमायतनगर तालुका क्रीडा संकुल व आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारत गेल्या अनेक वर्षांपासून नसल्यामुळे विद्यार्थ्यांना भाड्याच्या इमारतीत राहावे लागत होते.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारत मंजूर केली असुन तालुका क्रीडा संकुल आदीवाशी इमारत बांधकामासह 13 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.
हिमायतनगर तालुका क्रीडा संकुल,आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह भव्य इमारत घारापूर रस्त्यावर उभी राहणार आहे. करंजी जोड रस्ता,दाबदरी तांडा लोकार्पण सोहळा यासह 17 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन बुधवारी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. आजपर्यंत आदिवासी मुलांना हक्काचे वस्तीगृह नसल्यामुळे वस्तीगृह भाड्याने घेऊन अपुऱ्या जागेत सुरू होते.याचबरोबर तालुका क्रीडा संकुल चा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.जागा उपलब्ध नसल्यामुळे क्रीडा संकुल होत नव्हते यासाठी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रशासनाच्या यंत्रणेला सोबत घेऊन तालुका क्रीडा संकुलसाठी व आदिवासी मुलांचे वस्तीगृह करीता जागा उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी 12 कोटी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला त्याबरोबरच करंजी गावच्या जोड रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.यासह विविध विकास कामांचे दि.14 आगस्ट रोजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते एकुण 17 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुभाष राठोड,तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी दिली आहे. हिमायतनगर तालुक्यात आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची इमारत व क्रीडा संकुल उभे होणार असून शहराच्या वैभवात नव्याने भर पडणार असुन आ.जवळगावकरांच्या विकास कामाबद्दल जनतेतून कौतुक होत आहे.
