हदगाव तालुक्यातील तिर्थक्षेत्र केदारनाथ येथे दर्शनासाठी पवित्र श्रावण मास मध्ये विदर्भ मराठवाड्यासह तेलंगणातील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते.त्याबरोबरच आ.माधवराव पाटील जवळगावकर सहकुटुंब दरवर्षी केदारनाथाचा अभिषेक करून महापुजा करीत असतात जवळगावकर परिवाराची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असुन ती आजपर्यंत अखंड पणे सुरू आहे.दि.12 आगस्ट रोजी सकाळी 4 वाजता आ.माधवराव केदारनाथाचा अभिषेक करून भव्य पुजा केली.येथे येणाऱ्या व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी आ.माधवराव पाटील जवळगावकर, सौ अनिताताई पाटील जवळगावकर, नेहाताई जवळगावकर यांनी दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली.
आ.जवळगावकर कुटुंबियांचा श्री तिर्थक्षेत्र केदारनाथ चरणी अभिषेक व भाविकांना महाप्रसाद
0
August 12, 2024
