प्रहार जनशक्ती पक्षाच्या हिमायतनगर शहराध्यक्षपदी माधव कानोटे यांची निवड ...

हिमायतनगर प्रतिनिधी/(दत्ता पुपलवाड)प्रहार जनशक्ती पक्षाच्या हिमायतनगर शहराध्यक्षपदी माधव कानोटे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील सामाजिक कार्यात नेहमी सहभागी राहून शेतकऱ्यांसह सामान्यांना न्याय मिळवून माधवराव कानोटे हे नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या हिमायतनगर शहराध्यक्षपदी माधवराव दिगंबर कानोटे यांची निवड झाल्याबद्दल हदगाव तालूकाध्यक्ष अनिल कदम 
हिमायतनगर तालुकाध्यक्ष दत्ता देशमुख,संचालक दत्ता पुपलवाड, दत्ता अंबेपवाड,संघपाल प्रधान,विश्वाभंर कानोटे,बाळू जाधव, यांनी 
अभिनंदन केले आले आहे.
त्यांच्या निवडीचे पत्र जिल्हा प्रमुख विठ्ठल कल्याणकर, यांनी दिले आहे.या निवडीबद्दल सर्वांनी अभिनंदन केले असुन गावासह परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार असुन लवकरच माजी मंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक विम्यासह इतर अडचणी मांडणार असल्याचे कानोटे यांनी सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.