हिमायतनगर प्रतिनिधी/ (सोपान बोंपीलवार)
महाराष्ट्र कांग्रेस प्रदेश कमिटीच्या जिल्हा कांग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ प्रकाश वानखेडे यांची निवड करण्यात आली असुन निवडीबद्दल त्यांच्यावर हिमायतनगर तालुक्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्यावर आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी पक्षाची दिलेली जबाबदारी मोठी असुन ती विश्वासाने पार पाडणार असल्याचे डॉ प्रकाश वानखेडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या शिफारसीने
जिल्हा कांग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ प्रकाश वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे .या निवडीचे पत्र बि.आर.कदम नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (उत्तर ग्रामीण), हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते देऊन डॉ प्रकाश वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ प्रकाश वानखेडे म्हणाले की आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी टाकलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडणार असुन कांग्रेस पक्ष संघटन वाढवणार असल्याचे बोलतांना सांगितले डॉ प्रकाश वानखेडे यांची निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुभाष राठोड, हिमायतनगर कांग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, हदगाव कांग्रेस तालुकाध्यक्ष किशोर पाटील, सभापती जनार्दन ताडेवाड,बाळा पाटील टाकराळेकर, संदीप शिंदे,यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .
तसेच प्रथम नगराध्यक्ष अ.आखील अ.हमिद , माजी संचालक शेख रफिकभाई, शिवाजी पाटील,शहराध्यक्ष संजय माने, संचालक संजय पाटील, बाळू पाटील सुर्यवंशी,ज्ञानेश्वर शिंदे ,फेरोज खान, उपसभापती कदम,अश्रफ भाई,योगेश चिलकावार , नितेश जैस्वाल,मोहन ठाकरे,अ.बाकी भाई, सुभाष शिंदे,डॉ गफार,प्रविण कोमावार,पापा पार्डीकर, प्रविण जाधव,संतोष आंबेकर,दिपक कात्रे,यांच्यासह तालुका कांग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
