हिमायतनगर प्रतिनिधी/(ज्ञानेश्वर गोडसेलवार) शहरासह ग्रामीण भागातील विकास कामे करण्याचा केला काही कामे झाली नसली तरी शहरात काही भागातील राहिलेली ती कामे देखील लवकरच मार्गी लावणार असुन जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पुर्ण होत आहे ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांची कामे देखील मार्गी लावणार असुन विकासासाठी कमी पडणार नाही असे आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले ते बुधवारी झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
हिमायतनगर शहरात आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विकास निधीतून बुधवारी दहा कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. तिर्थक्षेत्र बोरगडी धानोरा मुख्य रस्त्याच्या काम सुरू होणार आहे याबरोबरच शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयास जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढावा लागत होता हा अतिशय महत्वाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित त्या कामासह पशुवैद्यकीय दवाखाना ईमारत जिर्ण झाली असून त्या इमारतीचे नव्याने भव्य काम होणार आहे.तसेच गणेशवाडी येथे सि.सि.रस्त्याचे काम होणार असुन वार्ड क्रमांक 16 मधील काही रस्ते या निधीतून पुर्ण होणार आहेत.या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ.जवळगावकर म्हणाले की शहरासह ग्रामीण भागातील जनतेनी विश्वासाने निवडून दिले त्यांच्या विश्वासाला पात्र राहून होईल तेवढी कामे करण्याचा प्रयत्न केला काही उर्वरित कामे राहिली असतील ती कामे देखील लवकरच मार्गी लावणार असुन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलताना दिली या उद्घाटनप्रसंगी उपअभियंता तुंगेवार ,कनिष्ठ अभियंता डांगे, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड,प्रथम नगराध्यक्ष अ.आखील , सभापती जनार्दन ताडेवाड,
माजी संचालक शेख रफिभाई, परमेश्वर गोपतवाड, विठ्ठल ठाकरे,पर्वतराव काईतवाड,डॉ प्रकाश वानखेडे, संजय माने, ज्ञानेश्वर शिंदे, नितेश जैस्वाल,सुरेश पळशीकर,फेरोज खान,पोलिस निरीक्षक अमोल भगत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सोनटक्के, पांडुरंग तुप्तेवार, योगेश चिलकावार,अश्रफ खान, बाळू पाटील, अ.बाकी भाई ,प्रविण जाधव, संतोष आंबेकर, प्रविण मारूडवार,पापा पार्डीकर, यांच्यासह कांग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
