हिमायतनगर येथील न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण

हिमायतनगर प्रतिनिधी /हिमायतनगर येथील दिवानी न्यायालयांच्या परिसरामध्ये न्यायाधीश यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. दि. २९ सोमवारी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. 

हिमायतनगर न्यायालयाचे न्यायाधीश कि. रा. खोंद्रे यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम न्यायालयात दि.  २९ सोमवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान पार पडला. न्यायालयांच्या परिसरात पिंपळ, वड, जांभूळ, कडुलिंब अश्या विविध गुणकारी  एकूण ६३ वृक्षांची लागवड न्यायाधीश खोंद्रे यांच्या हस्ते  करण्यात आले. 

न्यायाधीश व तालूका विधीसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अमोल भगत, नायब तहसीलदार रामचंद्र ताडेवाड, विशेष सरकारी वकील अँड. श्रीमती कोरेवाड, महिला संरक्षण अधिकारी संदिप कदम, नगरपंचायतीचे ओएस महाजन, आदींसह न्यायालयीन कर्मचारी, हिमायतनगर शहरातील जेष्ठ एडवोकेट दिलीप राठोड, अँड अतुल वानखेडे, अँड ज्ञानेश्वर पंदलवाड,इतर वकील बांधव आणि पक्षकारांची प्रामूख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.