हिमायतनगर प्रतिनिधी/तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत लागण्याची स्पर्धा सुरू झाल्याचे गेल्या दोन तिन वर्षात लागलेल्या नौकरी वरुन दिसत आहे.येथील कु गीता देवन्ना शेन्नेवाड यांची संभाजीनगर येथे पोलिस म्हणून तर शिवराम कैलास काईतवाड यांची नांदेड येथे पोलिस म्हणून नियुक्ती झाली आहे.
तिर्थक्षेत्र बोरगडी येथील कु.गीता देवन्ना शेनेवाड ,शिवराम कैलास काईतवाड हे पोलिस अधिकारी म्हणून यशस्वी झाले असुन त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील काईतवाड परीवरासह जक्कलवाड, शेन्नेवाड या परीवारातील अनेक जणांची शासकीय सेवेत वर्णी लागली आहे. झेडुं फुलाच्या उत्पादनात,दुध व्यवसायात येथील शेतकरी अग्रेसर असल्याचे दिसत आहे, अनेक गावात पुर्वी पेक्षा आजच्या अवस्थेत तरुण युवक व्यसनाकडे वळल्याचे प्रमाणात वाढ होत असली तरी श्रीक्षेत्र बोरगडी येथील युवक, तरुण शासकीय सेवेकडे झुकत असुन ज्यांना शासकीय सेवेत संधी मिळाली नाही अशा युवकांनी हिमायतनगर सारख्या ठिकाणी व्यवसायाकडे वळत आहेत
