हिमायतनगर प्रतिनिधी/ हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात रविवारी गारपीट अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची आ
माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट घेऊन निवेदन दिले तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
हदगाव हिमायतनगर तालुक्यात गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटिल , कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची मंगळवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट घेऊन गारपीट मुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान परिस्थिती बाबतीत निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. एकीकडे जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले असल्याने अनेक कांग्रेस कार्यकर्ते संभ्रमात असले तरी आ. माधवराव पाटील जवळगावकर हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत हे मात्र विशेष आहे.
