हिमायतनगर तालुक्यातील झालेल्या गारपिटीमुळे लोकप्रतिनिधींसह, प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर - शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी- आ. जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ रविवारी तालुक्यात अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असुन शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सह नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. सदरील गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 
     हिमायतनगर तालुक्यातील कामारी, खैरगाव, वाघी, विरसणी, टेंभुर्णी , बोरगडी, पळसपुर, सवना, सरसम यासह सज्जाच्या तलाठी मंडळ अधिकारी यांनी अनेक गावांना सोमवारी सकाळी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे परिस्थिती पाहणी केली. कामारी येथे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. हरभरा, गहू, काढणीला आला होता त्यामुळे या पिकांचे अधिकचे नुकसान झाले आहे. तर केळी, ज्वारी, टमाटा, गोबी, टरबूज या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदरील शेतकऱ्यांच्या शेतात लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असुन सर्व पंचनामे तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे अशा सुचना आ. जवळगावकर यांनी दिल्या आहेत.हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर यावर्षी पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे संकट आले असतांना पुन्हा आणखी अवकाळी पावसाचा तडाखा बसला असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाने मदत द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.