हिमायतनगर प्रतिनिधी/ देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या मागच्या 10 वर्षांतील योजना वंचितांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या "गांव चलो" अभियानातंर्गत कारला येेथी मतदारांंच्या घरोघरी भेट देऊन आढावा सांगण्यात आला असून या अभियानास चागंला प्रतिसाद मिळाला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे गाव चलो अभियान जिल्हा संयोजक तथा भाजपा जिल्हा चिटणीस माजी उपसभापती गजानन तुप्तेवार यांनी राज्यात सुरू असलेल्या गाव चलो अभियान राबविले गावात मतदारांशी भेटीगाठी घेत आहेत. राज्यात गाव चलो अभियान राबविण्यात येत असुन या अंतर्गत मोदी सरकारने केलेल्या कामाचा आढावा देण्यात येत आहे.शनिवारी कारला येथे गाव चलो अभियान जिल्हा संयोजक तथा भाजपा जिल्हा चिटणीस गजानन तुप्तेवार यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांना या अभियानाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे लक्ष्मण ढाणके, भिमराव लुम्दे,नानासाहेब ढाणके, रामा चिंतलवाड, बालाजी कदम, अशितोष रासमवाड, गजानन गाडेकर, रामा यमजलवाड, यांच्यासह गावातील भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मतदार उपस्थित होते. गाव चलो अभियानास प्रतिसाद मिळाला आहे.
