जगदगुरु स्वामी नरेंद्राचार्य महारांजाच्या रक्तदान शिबीरातुन अनेकांना जीवदान मिळेल - आ. जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ जगदगुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तगणांनी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात अनेकांनी रक्तदान केले या शिबिराचे उदघाटन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले असता नरेंद्राचार्य महाराज यांच्या सानिध्यात असणारे भक्त भविष्यात योग्य भक्तीमार्गाने चालतील त्यामुळे जिवन सुखी बनेल आणि या रक्तदान शिबीरातील रक्तदात्यामुळे अनेकांना जीवदान मिळेल हेच महाराजांचे आशिर्वाद राहणार असल्याचे सांगितले आहे. 
    हिमायतनगर शहरातील ग्रामीण रूग्णालयात गुरूवारी जगदगुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शरद वर्हाडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील, अ. अखिल,डॉ .राजेंद्र वानखेडे, गजानन सुर्यवंशी, गजानन चायल,संजय माने, ज्ञानेश्वर शिंदे, धांडे पाटील, सुभाष शिंदे, योगेश चिलकावार, आशिष सकवान, राम सुर्यवंशी,दिपक वाघमारे, नितेश जैस्वाल, यांची उपस्थिती होती. या शिबिरात बोलतांना आ जवळगावकर म्हणाले स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या सानिध्यात असणाऱ्या भक्तांचे जिवन सार्थकी होणार असुन नरेंद्राचार्य महाराज यांच्या सहवासात राहून त्यांचे विचार आत्मसात करावे याबरोबरच त्यांनी महाराष्ट्रभर रक्तदान शिबीर आयोजित करून या रक्तदान शिबीरातुन अनेकांना जीवदान देण्याचे अनमोल कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे जवळगावकर म्हणाले या रक्तदान शिबीरासाठी जिजाऊ ब्लड बॅंक नांदेड ची टीम उपस्थित होती. तालुका अध्यक्ष शिवाजी यटलेवाड, माजी ता. अध्यक्ष डॉ. सूर्यकांत माने, गंगाधर पडवळे, महिला ता. अध्यक्ष सुरेखाताई राठोड,तालुका कॅप्टन किशन कनलेवाड,ले. कॅप्टन ज्ञानेश्वर अंचटवाड, युवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण करेवाड,आनंद रासमवाड,अगंद सुरोशे,श्रीनिवास बोंपीलवार, यांच्यासह नरेंद्राचार्य महाराज सांप्रदाय मंडळाची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.